खांबाडा परिसरात वाघाची दहशत कायम बोडखा (मो) येथील शेळी केली ठार
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा तालुक्यातील बोडखा (मो) गावातील शेतकरी साई अभिमान अवचट या शेतकऱ्याचे शेत गावानजीक असल्यामुळे आपल्या शेतातील बंड्या वर जनावरे नेहमीप्रमाणे काल पण बांधून रात्री घराकडे आले आणि आज शेतात गेले असता वाघाने बकरी वर हल्ला केल्याचे लक्षात येताच वनविभागाला बोलावून पंचनामा केला आणि आर्थिक मदत मिळण्यात यावी ही मागणी तेथील शेतकरी करत आहे.
मागील काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाची दहशद आहे मागील काही दिवसआगोदर लोणार या गावा लगत असलेल्या शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ पडला होता हाच तर तो वाघ नाही ना? अशी धास्ती शेतकऱ्याच्या मनात निर्माण होत आहे या वाघाचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी होत आहे.