चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमध्ये निधीची उपलब्धता होणारच.

 चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमध्ये निधीची उपलब्धता होणारच.


ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधि

मनोज अगळे 9765874115



       ब्रम्हपुरी  /

                  चिमुर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यात येणाऱ्या ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी व २ उपसरपंचांनी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आमच्या गावाला विकासनिधी दिला नाही म्हणून काॅंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत. 

      कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत खणखणाट निर्माण झाला परिणामी विकासकामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात कालावधी लागत आहे. शिवाय राजीनामा देणारे सरपंच हे चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत असणाऱ्या गावातील असल्यामुळे या गावांना स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत नाम. वीजयभाऊ वडेट्टीवार यांना विकास कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

    स्थानिक आमदार विकासनिधीच्या अभावी त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. मात्र माननीय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना प्राप्त झालेल्या निवेदनानुसार सदर गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकास निधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. निधी प्राप्त होताच सदर गावांमध्ये विकासकामे करण्यात येत आहेत.

परंतु विकासनिधी देण्यास विलंब झाल्याचे एकमेव कारण हे कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत झालेला खणखणाट हे आहे.

        याशिवाय चिमुर विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांतील ग्रामस्थांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे मतभेद न करता गरजूंना नेहमीच आर्थिक, सामाजिक मदत देत असतात.

       तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व गावांतील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करत असतात. त्यामुळे दोन्ही विधानसभा क्षेत्रातुन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाही.

त्यामुळे चिमुर विधानसभा क्षेत्रातील त्या ९ गावातील सरपंच यांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमेटीने फेटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल न उचलता संयमाने भुमीका घेण्याचे आवाहन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काशीनाथ खरकाटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler