रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजुरावर जखमी.....
हल्ला चढवणारा रानडुक्कर पडला शेतातील विहिरीत..
चंद्रपूर जिल्हा सहसंपादक
राकेश भुतकर मो.8308264808
शेगाव बू :- शेगाव बू येथील शेतकरी प्रमोद रामाजी लांजेकर वय ४५ वर्ष यांच्या शेतात काम करत असताना शेतमजूर राजू रामाजी फुलकर वय ५० वर्ष या दोन्ही शेतकरी व शेतमजूर यांच्यावर रानडुक्कराने हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.त्यांना पुढील प्राथमिक उपचाराकरिता आरोग्यवर्धिनी केंद्र शेगाव बू येथे दाखल करण्यात आले.पुढील तपास शेगाव वनविभाग करीत असून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे . शेतात लावलेले पीक नष्ट करणे, शेतकऱ्यावर हल्ला करणे.अशा अनेक प्रकारचे नुकसान रांनडूकरांमुळे होत असून शासनाने याचा मोबदला देण्यात यावा व त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे .....

