45 वर्ष वयोगटा वरील सर्व नागरिकांना तात्काळ कोव्हिड लस द्या...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वैद्यकीय अधिकारी साखरखेर्डा यांच्याकडे मागणी....
दि :- 30 एप्रिल 2021 रोजी 45 वर्ष वयोगट यावरील सर्व नागरिकांना कोविड लस तात्काळ देण्यात यावी ची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच समस्त दरेगाव गावकरी मंडळी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा येथिल वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे *मनसे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे पाटील* यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.आपणास समस्त दरेगाव गावकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करतो की covid-19 महामारी मुळे आमच्या गावातील चार ते पाच व्यक्ती मृत्यू पावले असून दरेगाव हे गाव कोविड हॉटस्पॉट खरंच आहे तरी पुढील अनर्थ टाळण्यासाठी पंचेचाळीस वयोगटात वरील सर्व गावकऱ्यांना तात्काळ कोवीशिल्ड किंवा कोव्हाॅक्सीन या लसीद्वारे लसीकरण करण्यात यावे.