प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव मार्फत मौजे किनगाव येथे कोवीड सेंटर आणि कॉरेनटाईन उभारण्यात यावे असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*

*प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव मार्फत मौजे किनगाव येथे कोवीड सेंटर आणि कॉरेनटाईन उभारण्यात यावे असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले* 

सध्या संपुर्ण भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले आहे त्यातच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे सध्याची परिस्थिती खूपच बेताची निर्माण झाली आहे, किनगाव येथे कोरोना पेशंट चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच कोरोना बधिताच्या उपचारासाठी होणारी तारांबळ पाहता किनगाव शहर मध्ये एक कोवीड सेंटर आणि कॉरेनटाईन सेंटर उभारण्यात आल्यास पेशंटचे नुकसान होणार नाही, किनगाव हे गाव लोकसंख्येत खुप मोठे आहे बारा वाडी खेडे जोडलेली आहेत, पेशंटला उपचारासाठी अहमदपूर,लातुर जावे लागत आहे तेथे पण बेडची उपलब्धता होत नाही , ऑक्शिजन तुटवडा भासत आहे, म्हणून किनगाव मध्ये किमान 50 बेडचे कोवीड सेंटर उभारण्यात यावे असे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना उपविभागीय अधिकारी कुदळे साहेब यांच्या मार्फत ता अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखाअध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, इतर प्रहार सेवक पदाधिकारी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler