लाखनवाडा गावांमधील तीनशे वर्षाची समाजबांधवांची प्रथा अजूनही कायम मेंढपाळ बांधवाच्या नंगर सोहळ्याला सुरुवात
: अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,बुलढाणा जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात वास्तव्यास असणाऱ्या धनगर तसेच मेंढपाळ समाजाचा खंडोबा दैवत असलेले सर्व समाज बांधवांच्या नंगर सोहळ्याला २७ एप्रिल २०२२ रोजी सुरुवात झाली.खामगाव तालुक्यातील असणाऱ्या लाखनवाडा या गावांमध्ये हा दोन दिवसाचा नंगर सोहळा संपन्न होत आहे.या नंगर सोहळ्याला जवळपास तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली असून यापुढे मेंढपाळ आणि धनगर समाज बांधवांचा खेडेपाडी कसे डोंगर-दर्यांमधे राहणार मेंढपाळ आणि धनगर या उत्सवाला हजेरी लावत असतो.मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव बंद होता.त्यानंतर काल रात्रीपासून खंडोबा मंदिरात जागरण गोंधळ,भारुड,भजन,आधी सुरुवात होती.जुनी प्रथेनुसार बैलगाडीमधून हळद भंडारा लावून वाजत गाजत मिरवणूक काढतात.हजारोच्या संख्येने भाविक उत्साहात सहभागी झाले होते.महाप्रसादानेया कार्यक्रमाची सांगता होते.आजच्या कार्यक्रमाला उत्सवाला सुरुवात झाली.या वेळीउपस्थिती सुरेश सूर्यवंशी,रामदास सावळे ,रमेश सूर्यवंशी,कृष्णा चौधरी,गणेश हटकर ,दीपक बोदडे,भागवत बाहेकर,रामेश्वर वाघ.आदी सर्वजण सोहळ्याला उपस्थित होते.