ब्रेकिंग न्यूज----सावली तालुक्यात डेल्टा प्लस चा रूग्न
सावली तालुका प्रतीनीधी
प्राजक्ता गोलेपल्लीवार मो.7218949428
सावली-सावली तालुक्यातील एका तरुणाला करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराच्या विषाणुची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.सदर व्यक्ती जुलै महिन्यात पाॅजेटिव्ह आला होता.हा व्यक्ती करोना मुक्त झाला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी करण्यात आली.असून त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.लोकांनी घाबरून जाऊ नये.खबरदारी म्हणून तालुक्यातील नागरीकांनी सर्दी खोकला ताप या सारखी लक्षणे असल्यास ग्रामीण रुग्णालय सावली येथे RTPSR चाचणी करून घ्यावी.निफंद्रा अंतरगाव निमगाव या गावात सर्व्हे चालू असुन नागरीकांनी सहकार्य करावे.लाकडाऊन टाळण्यासाठी नागरीकांनी स्वता काही बंधने पाळणे आवश्यक आहे.करोना अजुनही हद्दपार झालेला नाही.नागरीकांनी माक्स वापरावा सामाजिक अंतर ठेवावे.साॅनिटायजर वापरावा.तिसरी लाट रोखण्यासाठी सावली तालुक्यातील जनतेने आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणेनेला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी केले आहे.
