भारतीय जनता पार्टी सावली तर्फे राज्यसरकार व महावितरण कंपनी विरोधात दिनांक 27/08/2021 रोज शुक्रवारी दुपारी ठीक 1.00 वाजता महावितरण कार्यालय सावली येथे धरणे आंदोलन.

भारतीय जनता पार्टी सावली तर्फे राज्यसरकार व महावितरण कंपनी विरोधात  दिनांक 27/08/2021रोज शुक्रवारी दुपारी ठीक 1.00 वाजता महावितरण कार्यालय सावली येथे धरणे आंदोलन.

सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता गोलेपल्लीवार मो 7218949428



सावली -नुकताच राज्य महाविकास आघाडी सरकारच्या आदेशाने तालुक्यातील सर्व ग्रा.पं. चे स्ट्रीट लाइटचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापलेले आहे. संपूर्ण तालुक्यातील ग्राम पंचायतचे वीज कनेक्शन कापल्याने ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य गण तथा भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्य महाविकास  आघाडी सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलनात एकजुटीने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान भाजपा सावली तालुकाध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश पाल यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler