शहर कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरणावर भर दया,,नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरणावर भर दया,,नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे

तहसीलदार यांच्या दालनामध्ये सभेचे आयोजन,,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी



शहराला कोरोनापासुन दुर ठेवण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा. लस घेण्यापासून कुणीही वंचित राहु नये असे निर्देश नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी सभेमध्ये दिले.

              कोवीड-१९ च्या तिसरी लाटेच्या पुर्व तयारी संदर्भाने गडचिरोली शहरात लसीकरण १०० टक्के उद्धिष्ट पुर्ण करण्याबाबत व लसीकरण ची सूक्ष्म नियोजन करण्या संदर्भात तहसीलदार यांच्या दालनामध्ये मा. तहसिलदार महेंद्र गणवीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात,डॉ.मडावी यांच्या मार्गदर्शनात व मुख्याधिकारी संजीव ओव्होड यांच्या प्रमुख उपस्थित सभेचे आयोजन करण्यात आले होते.

        शहरामध्ये  डेल्टा + चे रुग्ण आढळले असुन रुग्णामध्ये वाढ होत आहे. याकरिता लसीकरण महत्वाचे आहे. रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे  की  नाही याची तपासणी करण्यात यावी. नगरपरिषद मध्ये येणाऱ्या प्रत्यकाचे लसीकरण झाले कि नाही हे तपासले जावे. दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबतीत यंत्रणेने गंभीर राहावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासुन वाचायचे असेल तर लसीकरण गरजेचे आहे. कुणीही लसिकरनापासून वंचित राहनार नाही यासाठी कठोर निर्णय घेण्याच्या सूचना नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी दिल्या. 

       यावेळी नप सभापती मुक्तेश्वर काटवे,नगरसेवक सतीश विधाते,संजय मेश्राम,नगरसेविका वैष्णवी नैताम,नीता उंदीरवाडे,अल्का पोहनकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler