पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडून मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत
सावली तालुका प्रतिनिधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील नागरिक शालीकराम मनिराम चापले हे शेतावर गेले असता झुडपात दडून असलेल्या वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले होते. सदर घटनेची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना माहीत होताच मृतकांच्या कुटुंबातील व्यक्ती ना तातडीची पाच हजार रुपयांची मदत पाठवली सदर घटना 2/९/2021 ला घडली
सदर मदत ही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांचे हस्ते देण्यात आली यावेडी माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य अनिल म्हशाखेत्री, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेरकी, गेवरा येथील कॉंग्रेस चे कार्यकर्त आकाश येनप्रेडीवार, अंकुश येनप्रेडीवार, हरिदास हुलके, हंसराज रामटेके, वसंत हुलके, इत्यादी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
