नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे यांची मागणी.
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली - सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील शालीकराम चापले हे शेतावर गेले असता झुडपात दडुन असलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.असल्याने गावाजवळील अंतरगाव निमगाव बारसागड इत्यादी ठिकाणी वाघाने धुमाकूळ घातला आहे.अनेक लोकांचे बळी गेले आहेत.शेतकऱ्यांना शेतिकळे जाण्यास भिती निर्माण झाली आहे.तरी लवकरात लवकर वन विभागाने लक्ष केंद्रित करून वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केली आहे.
