अन,,,शेतकरी राजा सापडला अडचणीत तीन एकरातील उत्तपनाची वन्यप्राण्यानी केले नुकसान
चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
प्रवीण वाघे
चिमूर तालुक्यातील खड़संगी जवळील सोनेगांव (वन) येथील शेतकरी बाबा नंन्नावरे यांच्या शेतातील मका पिकांची वन्यप्राण्यानी सम्पूर्ण नासधुस केली आहे.
सोनेगांव (वन) येथील शेतकरी बाबा नन्नावरे येथील रहिवासी असून वडिलोपार्जित त्यांची सोनेगांव (वन) येथे 3 एकर शेती आहे, या शेतीत मागील वर्षापासून नेहमी लावण्यात येणाऱ्या पिकाना फाटा देत वेगळे काही तरी पिके घ्यायची मनात इच्या निर्माण केली, त्याप्रमाणे कमी खर्चात जास्त उत्तपन्न होणारे मका या पिकाकड़े त्यांची ओढ़ निर्माण झाली, अन पूर्ण 3 एकर शेतात मका या पिकाची लागवड केली, मागील वर्षी याच 3 एकरात लावलेल्या मकाचे उत्तपन 3 लाखापर्यंत झाले असून याही वर्षी शेतात त्यानी मका पिके लावली होती, मका आता झाडाना लागणार तेच येन मका लाग्न्याच्या वेळेतच जंगली वन्यप्रन्यानी 3 एकरातीलही मका पिके पूर्णता उध्वस्त केले, त्यामुळे सोनेगांव येथील शेतकरी बाबा नन्नावरे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतात लावलेली लाखो रूपयाची लागवड पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, कर्ज काढून लावलेल्या लागवडीचे पैसे कैसे फेड़नार हा गंभीर प्रश्न त्यांच्यासामोर उभा ठाकला आहे, प्रशासनाने आर्थिक भरपाई धावी, असी मागणी शेतकरी बाबा नन्नावरे यानी केली आहे.
