शिक्षक दिनाच्या औचित्यावर वासवी फाउंडेशन तर्फे अमोलच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व शालेय साहित्य वाटप...
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावात पूजा फाउंडेशन ची स्थापना करून व्यापक प्रमाणात तळागाळातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची उत्कृष्ट कामगिरी अमोल मोरेश्वर नन्नावरे हा युवा सामाजिक कर्यकर्ता करत आहे. सुरुवातीला 5 विद्यार्थ्यांपासून सुरु केलेला हा प्रवास तब्बल 50 च्या वर विदयार्थ्यांपर्यंत पोहचला आहे आज 50 च्या वर विध्यार्थी अमोल कडे ज्ञानाचे धडे घेत आहे. त्यामुळे शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी वसावी फाउंडेशन चे अध्यक्ष आदरणीय इंजि, अक्षयभाऊ बोंदगुलवार व इंजि, नीरजभाऊ बोंदगुलवार यांच्या तर्फे अमोल चा सत्कार करून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यांच्या या कार्याला आदरणीय इंजि, अक्षयभाऊ बोंदगुलवार तसेच अमोल चे प्रेरणास्थान प्रयास फौंडेशन चे फॉऊंडर माननीय प्रणय सातकर सर, अमोल बोधाने व मित्र परिवार यांचं महत्वाचं सहकार्य आहे त्याचबरोबर पूजा फाउंडेशन च्या माध्यमातून व्यापक प्रमाणात ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक खेड्यात राबविण्याचा अमोल चा माणस आहे कारण कोरोनाच्या भीषण परस्थितीमुळे सगळीकडे दोन वर्षांपासून शाळा
बंद आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे त्यांचा शौक्षणिक स्तर बऱ्याचपैकी खालावलेला आहे आणी अश्याच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून देशाच उज्वल भविष्य घडविण्यात एक छोटास योगदान देता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे ....
