केंद्रातील भाजपा सरकार वर श्री नाना पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा हल्लाबोल,,

 केंद्रातील भाजपा सरकार वर श्री नाना पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा हल्लाबोल,,

गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021



     आज जिल्हा काँग्रेस कमिटी ,गडचिरोली कार्यालय उदघाटन प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेला सामोरे जाताना श्री नाना पटोले आमदार व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केंद्र सरकार वर जोरदार हल्ला चढवला,

    पुढील काळात येणाऱ्या निवडणूक लक्षात घेता केंद्रात असलेल्या भाजपा सरकारच्या काळात खूप मोठया प्रमाणात महागाई,बेरोजगारी,वाढली तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जो त्रास सर्व साधारण जनतेला होत आहे ते पटवून दिले,

2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने दाखवलेले स्वप्न आज भंग झाले आहे,

  भारतीय जनता पार्टी ने मिस कॉल करून केलेली सभासद नोंदणी काँग्रेस पक्ष करणार नाही तर जनतेपर्यंत पोहचून सभासद बनवले जाणार आहेत,

महाराष्ट्र राज्यात 13 कोटी जनता आहे त्यापैकी 1 कोटी जनतेची सभासद नोंदणी 3 महिण्यात पूर्ण करणार असा विश्वास या पत्रकार परिषदेतून दिला,

        या सभासद नोंदणी त 60 टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असे पण त्यांनी सांगितले,

         आज सर्वत्र कॉग्रेस पक्षाचा विचार पसरवणे गरजेचे आहे,

या पत्रकार परिषदेत श्री विजयराव वडेट्टीवार मंत्री यांनी तर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की गडचिरोली चा जर मी पालक मंत्री झालो तर नक्कीच दारू सुरू करणार,या पत्रकार परिषदेला श्री,अभिजित वंजारी आमदार पदवीधर मतदार संघ, श्री अतुल लोंढे प्रवक्ते,माजी आमदार श्री आनंदराव गेडाम,श्री मारोतराव कोवासे माजी खासदार, श्री नामदेवराव उसेंडी,श्री राम मेश्राम प्रामुख्याने हजर होती,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler