गडचिरोली येथे काँग्रेस पक्षाचा भव्य दिव्य मेळावा संपन्न,,

 गडचिरोली  येथे काँग्रेस पक्षाचा भव्य दिव्य मेळावा  संपन्न,,

श्री नाना पटोले आमदार तथा प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष नोंदणी अभियाना ला सुरुवात,,

गडचिरोली प्रतिनिधी

 संदीप कांबळे 9421318021




       आज गडचिरोली शहरात शिवाजी महाविद्यालय च्या भव्य पटांगणात काँग्रेस या पक्षाचा भव्य दिव्य  कार्यकर्ता मेळावा व पद्ग्रहण सोहळा पार पडला,

     या मेळाव्याला श्री नाना पटोले आमदार तथा प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनेक विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला,

     श्री विजयराव वडेट्टीवार कॅबिनेट मंत्री आपत्ती व्यवस्थापन,यांनी आपल्या भाषणात कार्यकर्ता कसा असावा,कार्यकर्त्याने 5 तत्वावर काम केले पाहिजे,ती पाच कामे संपर्क,समर्पण,संवाद,सादगी, संबंध या गोष्टीवर विशेष भर दिला पाहिजे, व कार्यकर्त्याना जोडणारा असावा असे मत व्यक्त केले,

     या मेळाव्याला मार्गदर्शन करते प्रसंगी श्री नाना पटोले यांनी तर गडचिरोली जिल्यात 5 लाख सभासद नोंदणी करावी असे यावेळी कार्यकर्त्यांना केले व या प्रसंगी श्री,राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावे असे ठराव या वेळी करण्यात आला,व मंडपातील सर्वांनी या मताला हात वर करून अनुमोदन देण्यात आले,

     श्री अभिजित वंजारी आमदार विधान परिषद,श्री अतुल लोंढे प्रवक्ते,श्री मारोतराव जी कोवासे माजी खासदार, श्री डॉ नामदेवराव उसेंडी श्री डॉ,नितीन कोडवते,श्री जेसा मोटवानी माजी नगराध्यक्ष,श्री बंडोपंत मलेलवार माजी अध्यक्ष जि, प, श्री हसन गिलानी माजी जिल्हाध्यक्ष,श्री बाळासाहेब कुलकर्णी,ऍड, राम मेश्राम जि, प सदस्य ,व गडचिरोली जिल्यातील अनेक नामवंत काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते या मेळाव्याला हजर होते,

या मेळाव्याला जिल्हा भरातून जवळ पास दहा हजार कार्यकर्ते कोरची पासून भामरागड ते सिरोंचा पासून कार्यकर्ते हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler