बनावट सोने देऊन महिलेची पाच लाखाची फसवणूक
देऊळगाव राजा शहरातील घटना:
दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल
राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक
देऊळगाव राजा.कमी कींमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून देऊळगाव राजा शहरातील एका महीलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली असुन या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वैशाली महादेव सरड वय 34 वर्ष यांनी पोलिसाला तक्रार दिली आहे वैशाली गरड या खाजगी कंपनी मध्ये काम करत आहे.13 एप्रिल रोजी अमोल आणि नारायण नामक दोन व्यक्ती त्यांच्याकडे आल्या व कमी भावात सोने देतो असे आमिष त्यांना दाखवले. आमिषाला बळी पडलेल्या वैशाली गरड यांनी दोन्ही आरोपींना पाच लाख रुपये दिले त्या बदल्यात सोने देऊन दोन्ही आरोपी पलायन केले.आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच वैशाली गरड यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत. दरम्यान देऊळगाव राजा परिसरात गुन्हेगारांची घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
