💥खतांची दरवाढ रद्द करा नसता शेतकर्यांसह रस्त्यावर उतरू महाराष्ट्र नवनिर्माण सेना
यांचा शासनाला इशारा 💥💥 तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर
प्रतिनिधी:-सिंदखेड राजा
शेतीचा हगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या कच्च्या मालाचे भाव वाढले सांगून सर्वच कंपन्यांनी खताच्या किमतीत जबर वाढ केली आहे या दरवाढीमुळे इतकी महागडी खते वापरून शेती कशी करायची हा संभ्रम शेतकऱ्यांत तयार झाला आहे .केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यात मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केले .असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे . अगोदरच वाढलेली महागाई कोरोनाचे संकट लॉकडाऊन मुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे .अशा परिस्थितीत हा खताचा दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे.
खरंतर केंद्र सरकारने या वर्षी खत्यावरील अनुदान दर नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते परंतु केंद्र सरकारने मागच्या वर्षीचे अनुदान खताच्या दरवाढीला एक प्रकारे हातभार लावण्याचे काम केले आहे.
तरीही केंद्र सरकारने सदरील खतांची दरवाढ कमी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
1)शिवा दादा पुरंदरे मनविसे जिल्हाध्यक्ष
2)निलेश देवरे मनसे तालुकाध्यक्ष
अतिश राजे जाधव मनविसे जिल्हा उपाध्यक्ष
3)महेंद्र पवार मनसे परिवहन तालुकाध्यक्ष
3)अभिजीत देशमुख मनसे तालुका उपाध्यक्ष
4)अंकुश चव्हाण मनविसे तालुकाध्यक्ष
5)अनिल जाधव मनविसे विद्यार्थी सेना सिनखेडराजा शहराध्यक्ष
6)स्वप्नील जाधव महाराष्ट्र सैनिक