अवकाळी झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीणे शेतपिकांच्या नुकसानीची पंचनामे करून शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या!
चिमुर तालुक्यातील प्रहार सेवक यांचे तहसिलदार यांच्याकडे निवेदनातून मागणी.
प्रतिनिधी-प्रवीन वाघे
मो, 7038115037
चिमुर-तिन दिवसापासून चिमूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. तालुक्यात काही भागात जोरदार तर काही तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील कापूस, हरभरा, गहु, तूर, वाटाणा, मक्का, लाखोळी, उडीद, मुंग, मिरची व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नव्याने आलेल्या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.त्यावेळी प्रहार सेवक आदीत्य कडू ,कैलास आलाय, मुरलीधर रामटेके,अशिद मेश्राम, मिलिंद खोब्रागडे, ऋतिक जांमुळे,आदीत्य इंगोले,आदी उपस्थित होते.