खेमजई येथे ग्रा.प.पदाधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन.....

खेमजई येथे ग्रा.प.पदाधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार व  दिनदर्शिका प्रकाशन.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न8308264808



वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथून जवळच असलेल्या खेमजई येथे ग्राम पंचायत वतीने संताजी महाराज जगनाडे पुण्यतीथी निमित्ताने १ जाने २०२२रोजी जि.प.शाळेच्या पटांगणात पदाधिकारी,कर्मचारी यांचा डायरी,पेन व दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रमोद गंपावर तर प्रमुख मार्गदर्शन पोलिस स्टेशन शेगांव (बु) चे ठाणेदार अविनाश मेश्राम,उपनिरीक्षक प्रविण जाधव,पंचायत समिती सदस्य वंदना दाते,माजी कृषी सभापती कन्हैय्यालाल जयस्वाल, माजी सरपंच रमेश बावणे,सरपंच मनीषा चौधरी,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण बलकी,पोलिस पाटील विश्वनाथ तुरणकार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड,ग्राम पंचायत सदस्य भाऊराव दडमल,ग्राम पंचायत सदस्य धनराज गायकवाड ग्राम पंचायतचे सचिव येनचलवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती कन्हैय्यालाल जैस्वाल करण्यात आले.पोलीस स्टेशन शेगांवचे ठाणेदार मेश्राम व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका ही खेमजई गावातील पदाधिकारी, कर्मचारी यांची माहिती,महिला बचत गटाची माहीती, पंचायत समितीचे अधिकारी यांचे संपूर्ण नंबर असल्याने उपयुक्त ठरणार आहे. ही दिनदर्शिका खेमजई येथे प्रत्येक घरात मोफत देण्याचे उपसरपंच चंद्रहास मोरे यांनी सांगितले. कार्यक्रमात जि प शाळेचे सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, ग्रामपंचायत शिपाई, वनरक्षक,लाईनमन,पोलीस पाटील,रोजगार सेवक,ई. सत्कार करण्यात आला.ग्राम पंचायत सदस्य भाऊराव दडमल व प्रमोद गायकवाड यांच्या कडून मुलांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र रणदिवे, विनायकराव बावणे,देवेंद्र पोईनकार, प्रवीण तुमसरे ,योगेश कोहळे,अशोक दडमल,शत्रूघन शेरकुरे,शेषराव चौधरी,देवा दडमल इत्यादीनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चौधरी,सूत्रसंचालन उपसरपंच चंद्रहास मोरे तर आभार प्रदर्शन जि.प.शाळेचे शिक्षक संजू जांभूळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler