शिकून शाहने व्हा आणी मानसिक गुलामगिरी झुगारून समानता मिळवा :- अमोल मोरेश्वर नन्नावरे.

शिकून शाहने व्हा आणी मानसिक गुलामगिरी झुगारून समानता मिळवा :- अमोल मोरेश्वर नन्नावरे.


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकरमो 8308264808


स्थानिक शेगाव बु येथूनच जवळ असलेल्या दादापुर या गावात कोरोनाकाळापासून शैक्षणिक जागृती च्या उद्देशाने नेहमी समजभिमुख कामगीरी पूजा फॉउंडेशन मार्फत पूजा फौंडेशन चे अध्यक्ष कु. अमोल मोरेश्वर नन्नावरे व उपाध्यक्ष अमोल बोधाने करीत आहे. याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून विध्यार्थ्यांना व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व कळावं  आणी त्यांना त्यांच्या हक्काची, अधिकाराची, व देशाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून पूजा फौंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला.यावेळी शिक्षणाचे महत्व विशद करताना अमोल नन्नावरे बोलले कि विद्यार्थी हा स्वाभिमानी, आनंदी, प्रामाणिक, सुविचारी,राष्ट्रप्रेमी, नम्र, अभ्यासू, खिलाडू,शिस्तप्रिय,आदर्श, सुशील, सद्गुणी असावा असं प्रतिपादन केल. त्याचबरोबर विध्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावी म्हणून निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,अश्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्याच कार्य पूजा फॉउंडेशन दादापुर करीत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूजा फाऊंडेशन चे अध्यक्ष अमोल मो नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल बोधाने, सचिव आशिष कुंभारे,मा. प्रवीण निमजे (मुख्याध्यापक जि.प. शाळा.दादापुर ) मा.प्रवीण हजारे (शिक्षक)  सौ.रसिका नन्नावरे,अक्षय बोधाने, अमित लेडांगें,  प्रवीण नन्नावरे, अमोल लेडांगे, अल्का चौधरी, कार्तिक नन्नावरे, रुपाली वाघ,हर्षल बोधने,  सौंदर्य कुंभारे, विध्यार्थी आणी गावकरी उपस्थितीत होते. कार्यक्रमाची प्रस्तावना समृद्ध गायकवाड यांनी केली तर सूत्रसंचालन सांची तितरे व आभार प्रदर्शन भक्ती बोधाने यांनी केल...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler