तत्कालीन ग्रामपच्यायत सचिवाने ग्रामपंच्यातीच्या पैसावर मारला ताव ग्रामपचायत घेत आहे आता त्याच्या चौकशी साठी जिल्हा परिषदे कडे धाव

तत्कालीन ग्रामपच्यायत सचिवाने ग्रामपंच्यातीच्या पैसावर मारला ताव ग्रामपचायत घेत आहे आता त्याच्या चौकशी साठी जिल्हा परिषदे कडे धाव


जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- गावाचा विकास व्हावा गाव निरोगी राहावं नागरिकांना सुखसुविधा मिळाव्या या साठी प्रत्येक ग्रामपचायती मध्ये ग्रामसेवक हे महत्वाचा अजेंडा असतो परंतु याला अपवाद कोसरसार ग्रामपंच्यात येथील तत्कालीन ग्रामसेवक दुर्गे यांनी ग्रामपचायती च्या निधी मध्ये अफरा तफर करून हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे 

      ग्रामपंचायत कोसरसार चे तत्कालीन सचिव  आर. जी. दुर्गे यांनी सन २०१७-२२ पर्यंत च्या कार्यकाळात प्रचंड प्रमाणात आर्थिक व्यवहार करून ग्रामपंचायत चा ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, १४ आयोग निधी, दलित वस्ती सुधार योजना, स्वछता अभियान इ. फंडाच्या खात्यातील विकासकामे न करता पैशाची नियमबाह्य उचल केली. १४ वित्त आयोग आणी १५ वित्त आयोगाचे व्यवहार हे peace multi purpose service या बनावटी देयकाद्ववारे उचल करण्यात आली. या दोन्ही वित्त आयोगाचा व्यवहार PFMS प्रणालिद्वारा करण्याबाबत चा शासन निर्णय असताना सचिव दुर्गे यांनी सदर योजनेच्या खात्यामधून धनादेशाद्वारे व्यवहार केले आहे. त्याच प्रमाणे सादर योजना फंडातून व ग्रामनिधी मधून टॅक्स वसुलीच्या रकमेतून कामे न करता संपूर्ण रक्कम अपहार केली आहे असा आरोप ग्रामपचायत कार्यालयाने केला आहे 

    सरपंच ग्रामपंचायत कोसरसार :- 

            आम्हाला ही बाब लक्षात येताच आम्ही तात्काळ पंचायत समिती कडे तक्रार केली त्याचा तक्रार क्रमांक ४०२२ हा असून ही तक्रार  दिनांक २७/०४/२०२२ ला दिली   पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्या कडे चौकशी चे आदेश देण्यात आले होते तरी सुद्धा आजपर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही. या तक्रारी बाबत आम्ही विस्तार अधिकारी आणी तत्कालीन  BDO यांना विचारणा करायला गेलो असता आम्हाला उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले. 

     आमच्या ग्रामपचायती च्या पैशाची अफरा तफर करणाऱ्या तत्कालीन सचिव दुर्गे यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्ही पंचायत समिती समोर आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामपचायत सरपंच यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler