प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत विश्वशांती विद्यालय सावली येथे JE लसिकरण मोहीमेचा शुभारंभ

 प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत विश्वशांती विद्यालय सावली येथे JE लसिकरण मोहीमेचा शुभारंभ


उमेश गोलेपल्लीवार

तालुका प्रतिनिधी सावली

सावली- दिनांक ०३/०१/२०२२ ला प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत विश्वशांती विद्यालय सावली येथे JE लसिकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आले.त्याप्रसंगी उदघाटक म्हणून मा.विजय भाऊ कोरेवार पंचायत समिती सभापती यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी डॉ.थेरे सर तालुका आरोग्य अधिकारी सावली डॉ.सौरभ गोबाडे सर वैद्यकीय अधिकारी जीबगाव. आरोग्य साहाय्यक आवळे सर .ठिकरे सर. सर्व आरोग्य सेवक . आरोग्य सेविका.आशा.तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होते.विश्वशांती विद्यालय सावली येथील एकुण ४०६ विद्यार्थ्यांना JE लसिकरण करण्यात आले.यासाठी विश्वशांती विद्यालय सावली येथील शिक्षकवृंदानी सहकार्य केले.लसिकरण १ ते १५ वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात आले.आपल्या देशात जापनीज मेंदुज्वर (JE) या रोगाचा प्रसार वाढला असून या रोगाला आळा घालण्यासाठी शासनाने लसिकरण मोहीम सुरू केली आहे.या मोहीमेनंतर JE लस ९ ते १२ महीने आणि १६ ते २४ महीण्याच्या वयात नियमित लसिकरणा अंतर्गत दिली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler