नवीन वर्षात दुःखद घटना ;जनकापूर रिठात वाघाच्या हल्यात गुराख्याचा मृत्यु
उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली
सावली:-
वाघाच्या हल्लात गुराखी ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
जनकापूर रिठ येथील गुराखी श्री विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्ष हे आज सकाळी गावातील गुरे चराई करिता जंगलात नेले असता, कान्हाळगाव रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या वाघाने गुरख्यावर कंपार्टमेंट न. 147 हल्ला गुराख्याच्या नरडीचा घोट घेत ठार केले.
जनकापूर रिठ गावाला लागूनच असलेल्या जंगलात ही घटना घडली असून मृत व्यक्तीच्या कुटुंबात 2 मुल, पत्नी, आणि सासू असा आप्त परिवार आहे. घरची परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून कसे बसे कुटुंब चालवायचे परंतु घरचा कमावताच धनी गेल्यावर कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याचा कुटुंब कसा चालेल असा प्रश्न पडतो.
संबंधीत वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता नरभक्षक वाघाचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी केली आहे.