अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत आंनद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्ण आणि कांस्य पदक

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुडबॉल स्पर्धेत आंनद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्ण आणि कांस्य पदक

जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


वरोरा :-  जगन्नाथ विद्यापीठ, जयपूर (राजस्थान)येथे दि.27 ते 30  दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय वुडबॉल स्पर्धेमध्ये आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन च्या खेळाडूंनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपला विजय प्रस्तापित केला.

  अंजली चौधरी, अनुजा खिरटकर, विशाखा भोयर, मयुरी गाडगे यांनी स्ट्रोक इव्हेंट मध्ये सांघिक सुवर्ण पदक पटकावले.तर अंजली चौधरी, अनुजा खिरटकर यांनी स्ट्रोक इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावले तसेच मयुर भोयर ने  फेअरवे सिंगल इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावले.या सर्व खेळाडूंनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा विजय प्राप्त केला. 

   विजयी सर्व खेळाडूंचे आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्या प्रा. राधा सवाणे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर व महाविद्यालयातील समस्त  शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler