देऊळगाव राजा नगर परिषद यांनी पिण्याच्या पाण्याची सुरळीत व्यवस्था करण.
अँड राजू मान्टे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा
देऊळगाव राजा देऊळगावराजा नगर
परिषद अंतर्गत होत असलेली पिण्याच्या पाण्याची नळ वितरण व्यवस्था ही अत्यंत
दयनीय झालेली असून खडकपूर्णा धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतांनाही नागरीकांना १५-१५ दिवसानंतर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यातही सम्राट कॉलनी,
आदर्श कॉलनी, भगवानबाबा नगर, बालाजी नगर, सावता नगर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कमी दाबामुळे नागरीकांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत अनेक नागरीकांनी
आपल्या कार्यालयाकडे तक्रारी केल्याचे समजते परंतु आपल्या कार्यालयाकडून त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे नळाव्दारे होत असलेला पाणी पुरवठा हा दिवसा करणे आवश्यक असतांना रात्रीच्या वेळी नागरीक झोपेमध्ये असतांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नळाला पाणी आल्याचे नागरीकांना माहित होत नाही परिणामी लाखो लिटर पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. या सर्व प्रकारास नगर परिषदेची दोषयुक्त वितरण व्यवस्था
कारणीभूत आहे. शहरातील नागरीकांकडून ३६५ दिवसांची नळपट्टी वसुल केली जाते परंतु प्रत्यक्षात
मात्र १५-१५ दिवस पाणी पुरवठा करण्यात येत नाही त्यामुळे नागरीकांना पर्यायी व्यवस्था करुन टैंकरव्दारे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे व या सर्व बाबीना नगर परिषद जबाबदार असून त्याबाबत ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.तरी आपणासनम्र विनंती की, आपण या गंभीर व जीवनावश्यक बाबीकडे जातीने
लक्ष देऊन शहरातील पाणी वितरण व्यवस्था तात्काळ दोषमुक्त करुन नागरीकांना शुध्दयोग्य दाबात व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी अँड राजू मान्टे ,शेख कदिर (पत्रकार ) प्रकाश बस्सी ( पत्रकार ) शेख अतिक विकास आंधळे यश कासारे वैभव पंडित सिद्दु इंगळे प्रदीप खरात सविता काकडे वंदना झोटे अस्मिता नाडे कोमल खरात साईनाथ नागरे यांनी माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली
