श्री शिवाजी महाविद्यालया मध्ये "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
चिखली | मेघा जाधव दि.
२७ स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी श्री शिवाजी महाविद्यालय चिखली व महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा विषय होता कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज एस.देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री रामेश्वर वसु, महिला व बाल विकास अधिकारी, श्री धनंजय इंगळे API पोलीस स्टेशन चिखली, श्री गणेश सावळे समन्वयक, महिला व बाल विकास विभाग चिखली, श्री गजानन वायाळ, तालुका संरक्षण अधिकारी, मोताळा, श्री विष्णू आव्हाळे अध्यक्ष, गणराज्य फाउंडेशन चिखली ,IQAC समन्वयक डॉ.वनिता पोच्छि, मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश मालटे ,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जुक्कलकर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये श्री रामेश्वर वसू यांनी राजस्थानमधील भवरीदेवी यांनी त्यांच्यावरील अत्याचाराच्या विरोधात दिलेला लढा व त्यातून निर्माण झालेला विशाखा गाइडलाइन्स मधून महिलांना दिल्या गेलेले संरक्षण यावर प्रकाश टाकला. तसेच कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शासन कसे मात करते. त्याच बरोबर अनोळखी ठिकाणी एकाकी महिलेला मदत करणाऱ्या शासनाच्या योजना विषयी माहिती दिली. शासकीय योजनांची माहिती दिली. अनाथ मुलं मुलींकरिता सर्व हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिले. श्री धनंजय इंगळे यांनी आयपीसी *376, 326* *कलम* याविषयी माहिती दिली. तसेच पीडितांसाठी असलेली *मनोधैर्य योजनेबद्दल* माहिती सांगितलीं. राज्यघटनेतील दिलेले अधिकार आपल्याला माहिती पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अत्याचाराची माहिती दडवून न ठेवता शासकीय यंत्रणेकडे तक्रार नोंदवली पाहिजे ,असे आवाहन त्यांनी केले. श्री विष्णू आव्हाळे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन प्राचार्य यांनी *ICC समितीच्या* कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली .कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ.मीना निकम प्राणीशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुराधा मुळे तसेच आभार प्रा. डॉ. मुक्ती जाधव यांनी केले. तंत्र सहायक म्हणून प्रा. डॉ. सोनाली गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यशाळेला प्रा. डॉ. सुनिता कलाखे, प्रा. डॉ. पल्लवी नल्ले व प्रा. तृप्ती श्रीरामे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला भरघोस असा प्रतिसाद दिला. या कार्यशाळेला जवळपास 100 विद्यार्थी उपस्थित होते.
