जि. प. प्रा. शाळा दादापूर येथे वर्ग ४ थी चा निरोप समारंभ पार पडला...

 जि. प. प्रा. शाळा दादापूर येथे वर्ग ४ थी चा निरोप समारंभ पार पडला...



वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर

मो.न.8308264808


शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर येथील .जि .प . प्रा .शाळेतील

विध्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावं या उद्धेशाने या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.होते या प्रसंगी सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच अध्यक्ष म्हणून मा. श्री.सतिश कुंभारे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.सचिन कोटकर, मा. सौ.जोत्सनाताई अमर दोडके, सौ.वंदना अमोल डोंगरे, सौ संगिता ईश्वर नन्नावरे, सौ. कांता प्रमोद जांभूळकर यांची उपस्थिती होती. 

 यावेळी प्रविण निमजे मु.अ. यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि पुढील वाटचाली बाबत मार्गदर्शन केले तर श्री .सतिश कुंभारे अध्यक्ष,शा.व्य. स. यांनी वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच वर्ग ४ थी.च्या विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. आणि शाळेला संभाजी राजेची प्रतिमा आणि वाॕलवाॕच भेट दिली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन कार्यक्रम ची सांगता झाली.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण निमजे मु.अ. आणि प्रविण हजारे स. शि.यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler