विविध समस्याना घेऊन नेरी ग्रामपंचायत समोर प्रहारचे आमरण उपोषण
रस्त्यावर बेशरम चे झाडे लावून उपोषणाला सुरवात
चंद्रपूर प्रतिनिधी:-
विविध समस्यांनी ग्रासलेल्या नेरी ग्रामपंचायतीला जागे करण्यासाठी दि 28 एप्रिलला प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर बेशरम ची झाडे लावून व जलशुद्धीकरनाच्या पान्याच्या टाकीवर चढून प्रमुख समस्या चा निपटारा जो पर्यंत होत नाही तोपर्यंत टाटीवरून ऊतरनार नाही असा इशारा प्रहार सेवक प्रवीण वाघे यानी दिला आहे.आमरण उपोषण ग्रा प च्या समोर करणार आहे
नेरी गाव हे मागील अनेक वर्षांपासून अनेक समस्यानी ग्रासलेले आहे अनेकदा अर्ज तक्रारी निवेदन देऊन ही समस्यांचे समाधान होत नाही तेव्हा प्रहार संघटने आपल्या प्रमुख मागण्यांना घेऊन आमरण उपोषणाचे करण्याचे ठरविले आहे त्यात गावातील नाल्या व सांडपाण्याची व्यवस्था तर काही नाल्या ह्या चोरी गेल्या त्या दाखवा,पाण्याची टाकी अजीर्ण आहे ती नवीन टाकी बनवा दूषित पाणी पुरवठा थाबवा जलशुद्धीकरण टाकी ही करोडो रुपये खर्च करून बनवली आहे ती शोभेची वास्तू बनली आहे ती सुरू करा व शुद्ध पाणी पुरवठा करा या बोगस कामाची चौकशी करा निकृष्ठ दर्जाचे सिमेंट रस्ते यांची चौकशी करा व दुरुस्त करा बाजार चौकात स्त्री पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र मुत्रीघर व संडास बनवा तसेच नेरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी आणि शाळांवर कर थकबाकी आहे ती वसूल करा गोरगरीब जनतेला नाहक त्रास देऊ नका ग्रा प अंतर्गत येणारे गाळे एकाच व्यक्तीला 2ते3 भाड्याने दिले आहेत आणि ते आता बंद आहेत ते गाळे होतकरू गोरगरीब रोजगार करणाऱ्या बेरोजगाराना उपलब्ध करून द्या वार्ड न 4 मधील पुलाचे काम कायमस्वरुपी करा ठिगळ लावणे बंद करा तसेच सिमेंट रस्ते तयार करा अनेक वर्षांपासून हा वार्ड विकासापासून वंचित आहे ह्या प्रमुख मागण्यांना घेऊन प्रहार संघटना आमरण उपोषण आंदोलन करणार आहे सदर समस्या ह्या निवेदनाद्वारे ग्रा प प्रशासनाला कळविण्यात आले होते परंतु निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली होती त्यामुळे आमरण उपोषनाचे हत्यार उगारावले लागले असे प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी सांगितले आहे तेव्हा या लढ्यामध्ये नेरी वासीय जनतेनी सहभाग नोंदवावा आणि नेरीचा विकास साधावा असे आवाहन प्रहार संघटनेने केले आहे.
