इशारा देऊनही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत नाही म्हणून मनसेने आयुक्तांच्या घरचे नळ कनेक्शन कापले .

 इशारा देऊनही शहराचा

 पाणीपुरवठा सुरळीत नाही 

म्हणून मनसेने कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या घरचे नळ 

कनेक्शन कापले .

अभिषेक जगताप (औरंगाबाद )

जिल्हा प्रतिनिधी 90756 28711

मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन कापलंय. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न न सोडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन कापल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे साडेपाच वाजता महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन मनसे कार्यकर्त्यांनी कापलं.


8 दिवस उलटूनही कार्यवाही नाही, कार्यकर्त्यांनी दाखवला ‘मनसे दणका’


शहराचा पाणी प्रश्न सुटावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच त्यांना सविस्तर निवेदन दिलं होतं. पुढच्या आठ दिवसात यावर कार्यवाही करा असं मनसे कार्यकर्त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून सुचवलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler