सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करावे.- ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.
सावली तालुका प्रतिनिधी
उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935
सावली- बियाण्यांची खरेदी, शेतीला लागणारे खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणींमध्ये आलेला असताना पेरणी केल्या भात पिकांची आणि कपाशी ला व कपाशीच्या फळांना (बोन्ड) वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत फस्त केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असूून मोठा संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.
सावली तालुक्यातील जिबगांव,चक पेडगांव,उसेगांव,उद्रापुर,सिर्सी,
जाब बु,कवठी आदी ग्रामीण भागातील जनतेची संपूर्ण अर्थव्यवस्था किमान शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेती शिवाय शेतकऱ्याला कुठलाच पर्याय नाही. दरवर्षी निसर्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठतो, मागील वर्षी पुरामुळे शेतीची नुकसान तर कधी नापिकी होत असल्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोझाखाली दबून आत्महत्या करतो. शासनाच्या तुटपुंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना अनेकवेळा बॅंकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. एवढे करून सुद्धा आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहतात.
कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागतीची कामे शेतकरी करतो. त्यात कधी कधी पावसाचा लहरीपणा. त्यात पेरणी व लागवड केलेल्या कपाशीवर लागलेले कोवळे बोन्ड आणि कपाशी पिक, इतर पिकांची वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत हे फस्त करत असल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. जिबगांव,कवठी,उसेगांव,सिर्सी
जाब बु,आदी शेतशिवारामध्ये वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे.
या भागात रानटी डुक्कर, मोठ्या संख्येने वावरतात. हे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत असून त्यांच्या संपर्कात एखादा शेतकरी वा शेतमजूर आल्यास त्यासही जखमी किंवा जीवित हानी नाकारता येत नाही. वन्यप्राण्यांच्या धास्तीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरतात असल्याने शेतीची व कपाशी व नुकतेच कपाशीला लागलेले फळे (बोन्ड) प्राण्यांनी फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या परिणाम होणार असून या वन्यप्राण्यांचा संबंधित वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यानी केले आहे
