हिवरखेड येथे केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण तालुका खामगाव
![]() |
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी,8262087866,
तालुक्यातील हिवरखेड केंद्रांतर्गत येणा-या १० शाळांमधील इयत्ता १ ते ५ वी च्या इयत्तांना अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी सेविका यांचे शाळापूर्व तयारी प्रशिक्षण दि. ३० मार्च २०२२ शुक्रवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा एकूण ६० प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला. सदरील प्रशिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रिय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड येथे केंद्रप्रमुख रामदास मिरगे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उदघाटन व सावित्री पुजन हिवरखेड येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ हाके, केंद्रप्रमुख रामदास मिरगे व जि.प.शाळा किन्ही महादेव येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक गणेश राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रशिक्षणास जि.प.शाळा हिवरखेड येथील शिक्षक किशोर भागवत व जि.प.शाळा अंत्रज येथील शिक्षक सुनील मडावी यांनी सुलभक म्हणून कार्य केले.
दुपारनंतर अभिरुप शाळापूर्व तयारी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. मेळाव्याचे उदघाटन खामगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डायट बुलडाणा येथील जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे उपस्थित होते. तसेच हिवरखेड गावचे सरपंच सौ. मंदाताई संदिप हटकर, अनिलभाऊ हटकर, संदिपभाऊ हटकर, राजुभाऊ हटकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
अभिरूप शाळापूर्व तयारी मेळाव्यात प्रवेशपात्र बालके व त्यांच्यासोबत पालकही उपस्थित होते.
प्रशिक्षण व मेळाव्यासाठी हिवरखेड, अंत्रज, किन्ही महादेव, लोखंडा, घारोड, निरोड, नायदेवी, नागापूर, व पाळा येथील जि.प. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविकांनी सहकार्य करून प्रशिक्षण यशस्वी केले.....
