नेरी येथील तलावात मेलेल्या मासोळ्याची संपूर्ण गावात जोरदार दुर्गंधी
संपूर्ण मासोळ्या खड्डा खोदून पुरल्या तरी पण दुर्गंधी रोगप्रतिकारक किंवा सुगंधित द्रव्याची फवारणी करावी-जनतेची मागणी
जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता, उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिनिधी नेरी-प्रवीन वाघे
मो,7038115037
चिमुर तालुक्यातील नेरी येथील मध्यवर्ती तलावात दि 15 जूनला अज्ञात इसमाने विष प्रयोग करून शेकडो मासोळ्या ना यमसदनी धाडले लाखो रुपयांचे मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले असा संशय गावकरी व्यक्त करीत असताना त्या मेलेल्या मासोळ्या ची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभाग ग्रामपंचायत आणि मच्छिमार बांधव यांनी दखल घेऊन त्यांची विल्हेवाट लावली परंतु अजूनही त्या मासोळ्या ची दुर्गंधी गावभर पसरली असल्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा संबंधित विभागाने यावर उपाययोजना करावी तसेच ग्रा प नी रोगप्रतिकारक किंवा सुगंधित द्रव्याची फवारणी करावी अशी मागणी जनतेतून समोर येत आहे
सविस्तर याप्रमाणे आहे की नेरी तलावातील मृत मासोळ्याना मच्छिमार बांधवांनी एकत्र करून ग्रामपंचायतनी व आरोग्य विभागणी जे सी बी च्या साह्याने गड्डे खोदून त्या मृत मासोळ्या ना दफन केले जनतेच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तात्काळ कारवाई करीत ही उपाय योजना केली परंतु 2 दिवस होत नाही तर गावातील परिसरात पुन्हा एकदा दुर्गंधी पसरली जिकडेतिकडे वास ही वास पसरली आहे त्यामुळे आता नागरिक हैराण झाले असून या दुर्गंधी तुन त्यांची सुटका झाली नाही ही दुर्गंधी कुठपर्यंत राहील या विवंचनेत आता नागरिक सापडले आहेत तलावात सर्वत्र दुर्गंध पसरले आहे तेव्हा यावर स्थानिक स्वराज्य संस्था यांनी रोगप्रतिकारक किंवा सुगंधित द्रव्याची फवारणी करावी आणि दुर्गंधी ला दुर करावे तसेच संबंधित विभागाने सुद्धा पुन्हा एकदा उपाययोजना करून जनतेला होणाऱ्या त्रासातुन सुटका करावी अशी नागरिक मागणी करीत आहेत.

