. अखेर अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्ती .
मयुर मोरे
मेरा बू ,ता .चिखली ; - प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकर व उपकेंद्र मेरा बु या दोन्ही ठिकाणी गेल्या दिड ते दोन वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गोरगरीब रुग्णांना बाहेर गावी जावून खाजगी दवाखान्यात औषध उपचार घ्यावा लागत होता त्यामुळे आमच्या प्रतिनिधी ने मध्ये कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती करावी या मधळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती बातमी प्रकाशित होताच तात्काळ आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेत अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ बावस्कर यांची नियुक्ती केली मात्र मेरा बु उपकेंद्र अद्यापही वाऱ्यावर सोडून दिले आहे . अंत्री खेडेकर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत चार उपकेंद्र असून मेरा बु येथे आरोग्य उपकेंद्र आहे . या दोन्ही आरोग्य विभागाला गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर नाही या दोन्ही गावात अनेक प्रतिष्ठित पठारी असले तरी गोरगरिबांना औषध उपचारासाठी बाहेर गावी खाजगी दवाखान्यात जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे .गोरगरीब रुग्णांना सेवा मिळावी म्हणून अधिकारी वर्गांनी अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्राला गांगलगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ पांढरे यांच्याकडे पदभार सोपाविला मात्र डॉ पांढरे यांच्याकडे कायमस्वरूपी पदभार नसल्याने ते १५ दिवसातून एक वेळ आरोग्य विभागाला भेट देत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाच रुग्णावर उपचार करावा लागत होता . त्याच बरोबर मेरा बु येथील उपकेंद्राला रुजू झालेल्या डॉक्टरांनी आजारी रजा घेऊन सतत दोन गैरहजर राहल्या त्यामुळे आरोग्य सेवक व औषध निर्माण अधिकारी हेच रुग्णावर उपचार करू लागले होते अशा या प्रकारामुळे आमच्या प्रतिनिधी ने आरोग्य विभागाचा गलथान कारभाराच्या बातम्या वारंवार प्रकाशित करुण आरोग्य विभागाचा प्रकार जनतेसमोर उघडकीस आनला बातम्या वारंवार प्रकाशित झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दखल घेवून प्रभारी पदभार दिलेले डॉ पांढरे यांना गांगलगाव येथे मूळ ठिकाणी कायम करीत अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ बावस्कर यांच्याकडे कायमस्वरूपी पदभार सोपाविला आहे . मात्र एकीकडे अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती केली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर अभावी रामभरोसे सुरू असलेल्या मेरा बु आरोग्य उपकेंद्राचे काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .
याबाबत अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य विभागाला कायमस्वरूपी रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ बावस्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पदभार हाती घेताच सुरवातीला दवाखान्यातील सर्व मुख्यालयी राहणाऱ्या डॉक्टरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,आदी सुसुविधा पुरविल्या जाईल तसेच सर्व आरोग्य कर्मचारी सकाळ ते संध्याकाळ पर्यत आप आपल्या ठिकाणी दिलेल्या जागेवर हजर राहून रुग्णाना सेवा देतील जर १२ वाजेनंतर घरी गेल्याचे दिसून त्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली जाईल असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले .
