सह दुय्यमं निबंधक कार्यालयात वृध्दांची हेळसांड , अधिकारी मात्र हितसंबंध जपण्यात मश्गुल...*

 *सह दुय्यमं निबंधक कार्यालयात वृध्दांची हेळसांड , अधिकारी मात्र हितसंबंध जपण्यात मश्गुल...* 

  मयुर मोरे बुलढाणा जिल्हा सहसंपादक





चिखली .स्थानिक नगर पालीकेच्या जागेमध्ये सह दुय्यंम निबंधक वर्ग; २ अर्थात खरेदी विक्री कार्यालयाचा कारभार मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. सदर इमारत चिखली नगर परिषदेकडून भाडेतत्वावर घेण्यात आली आहे, मात्र याठिकाणी येणाऱ्या पक्षकारांना बऱ्याच गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने बाहेर उन्हात ताटकळत वाट पहावी लागते , या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था नसून महिला व पुरुषांसाठीदेखील प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही याचा फटका सर्वसामान्यं नागरिकांना बसत असून खरेदी विक्रीचे व्यवहार करायला आलेल्या वृध्दांची मात्र त्यामुळे दयनिय अवस्था होत आहे. त्यातच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने अनेकदा लिंक फेल असणे , नेटवर्क नसणे यासारख्या तांत्रीक अडचणींचादेखील सामना नागरिकांना करावा लागत असल्याने अनेकांना नंबर येईपर्यंत तासनतास ताटकळत बसावे लागते. 

दि 16 जून रोजी खरेदी विक्रीचा व्यवहार करायला आलेल्या एका जेष्ठं नागरिकाला कार्यालयात बसायला जागा न मिळाल्याने अखेर तेथील नालीलगत असलेल्या भिंतीचा आसरा घ्यावा लागला. बराच वेळ बसल्यानंतर पाठीला कळ लागल्याने आजोबांनी तिथेच नालीलगत वामकृक्षीदेखील घेतली. मात्र या विदारक परिस्थीतीकडे पहायला कुणालाही वेळ नव्हता.  

*कार्यालयाचे स्थलांतर होणे गरजेचे*

सर्वसामान्य नागरिकांचा होणारी परवड थांबविण्यासाठी या कार्यालयाचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर कार्यालय स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी काही वर्षांपुर्वी करण्यात आली होती. सदर बाब मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक वर्ग १ यांनी चिखली कार्यालयाला दि 03/08/2021 रोजी  दिलेल्या आकस्मीक भेटीमध्ये त्यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनीदेखील दि 04/08/21 रोजी सदर कार्यालया इतरत्र उपलब्धं असलेल्या शासकिय जागेमध्ये स्थालांतरीत करण्याची आदेश दिला होता. मात्र आजपर्यंत सदर आदेशावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. सदर कार्यालय स्थलांतरीत न करण्यामागे राजकीय दबाब असल्याचे बोलल्या जात असून काही बोटावर मोजणाऱ्या दस्तलेखकांसोबत हितसंबध जोपासण्यासाठी स्थलांतरीत होत नसल्याचे बोलल्या जात आहे.

काही वर्षापासून कार्यालयाचा आवाका प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सदर जागा अपूरी पडत आहे विशेष म्हणजे  या कार्यालयातील महत्वाचे अभिलेख इतरत्र भाडेतत्वावर गोडावून घेऊन ठेवण्यात आले आहेत. अशा परिस्थीतीत सदर कार्यालय चिखली येथील खडकपुर्णा प्रकल्पं वसाहत यांचे विश्राम भवनाकरीता बांधलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासंदर्भात दि ३/11/2021 रोजी उपरोक्तं दोन्ही कार्यालयांमध्ये करारनामा देखील झाला आहे. मात्र त्यानंतर कुठे माशी शिंकली अन अजुनही या कार्यालयाचे कामकाज  न प च्या जुन्या इमारतीमध्येच सुरु आहे. म्हणजेच केवळ एक दोन दस्तलेखकांचे हितसंबंध जोपासण्यासाठीच हे कार्यालय इथे सुरु ठेवण्याचा अट्टाहास तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. तुर्त एवढेच !


*प्रशस्त इमारतीचा शोध सुरू वरिष्ठ अधिकारी तेलंग*


 या संपूर्ण प्रकाराची माहिती दैनिक देशोन्नती ने वरिष्ठ अधिकारी श्री तेलंग यांना दिली असता त्यांनी कार्यालयात गैरसोय होत असल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली त्याचबरोबर पूर्वी करार झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय गैरसोयीचे व नागरिकांसाठी त्रासदायक  असल्याची ओरड  वृत्तपत्र व इतर माध्यमातून आल्यानंतर आता नवीन प्रशासकीय इमारतीत शोध घेणे सुरू असल्याचे सांगितले मात्र तोपर्यंत तरी यावर पर्याय नसल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler