वरोरा कृषिउत्त्पन्न बाजार समिती मध्ये बारदाण्याचा नाफेड मुळे नाफेड चना नोंदणी केलेले शेतकरी चना खरेदी च्या प्रतीक्षेत
प्रहार चे तहसील समोर भजन करून चना वाटप आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे
8928860058
वरोरा:- तालुक्यातील वरोरा कृषिउत्पन्न बाजार समिती मध्ये नाफेड चना खरेदी साठी नोंदणी केली परंतु वरोऱ्यात बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याचा माल खरेदी करण्यात आला नाही बाजार भावात आणी नाफेड च्या भावात जवळपास एक हजार रुपये फरक असल्यामुळे बहुतांश शेतकरी नाफेड च्या चना खरेदीला पसंती देतात परंतु अस्मानी तर कधी सुलतांनी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करा लागतो अशीच परिस्तिथी शेतकऱ्यावर आली.
शासनाने आदेश देऊन ही बारदान्याच्या आभावाने एक दिवस चना खरेदी बंद होती याच्या आधीपण बारदाना आणी टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगून 15 दिवस चना खरेदी बंद होती महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहकार मंत्र्यांना नाफेड चना खरेदी चालू करावी या साठी प्रश्न रेटून धरला आणी चना खरेदी ची तारीख सरकार ने वाढवली असताना बारदाना चा आभावं असल्याने चना खरेदी पहिल्या दिवशी बंद ठेवली तर दुसऱ्या दिवशी फक्त विस शेतकऱ्याचा चना खरेदी करण्यात आला ही सर्व माहिती प्रहार चे माजी शेतकरी तालुका प्रमुख किशोर डुकरे यांना माहित होताच अधिकाऱ्याला जॉब विचारला असता उद्या 50 शेतकऱ्याचा चना खरेदी करू असे सांगण्यात आले राहिलेल्या सर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचा चना तात्काळ खरेदी करावा अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली आणी काल प्रहार च्या आगळ्या वेगळ्या आंदोलनातून सगळ्याचे लक्ष वेधून घेतले शहीद योगेश डाहुले यांच्या स्मारकाची स्वछता करून चौकातून भजन करून तहसील मध्ये चना वाटप केला आणी निवेदनाच्या माध्यमातून लवकरात लवकर चना खरेदी साठी बारदाना उपलब्ध करावा अशी मागणी केली या आंदोलनाचे नेतृत्व किशोर डुकरे यांनी केले तर या आंदोलनाला तालुक्यातील प्रहार सेवक आणी शेतकरी उपस्तिथ होते

