बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत चोखामेळा या जलाशयाच्या भिंतीवरील वृक्ष लागवड करायचे सोडून खाजगी सिक्युरिटी यांच्या आशीर्वादाने वृक्षतोड जोमात सुरू
सौंदर्य फुलण्याअगोदरच पर्यटनाला हानी पोहोचत आहे.
मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखामेळा धारणा वर होती बरेच मोठमोठी झाडे, सौंदर्यात भर टाकत असताना पाटबंधारे विभागाकडून वृक्ष लागवड या अंतर्गत लावलेली झाडे मोठी झालेली आहेत. परंतु सदर धरणावर पर्यटन स्थळ निर्मिती करण्यापूर्वीच सदर झाडांची वृक्षतोड करण्यात येत आहे. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, सदर धरणावर खाजगीरित्या नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक भागिले यांना झाडे तोडणाऱ्यांनी तत्काळ फोन केला व आम्ही विचारले असता सदर झाडे अडचण करीत आहेत त्यामुळे तोडत आहोत असे सांगितले. वृक्षतोड करून तेथील सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सदर प्रकारे चिडी मारी करण्याचा व सर्रास पैसे कमावण्याचा धंदा सुरू आहे याकडे पाटबंधारे विभाग यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सदर धरणावर पाटबंधारे विभागाचे कोणी अधिकारी लक्ष देत नाहीत तसेच सदर झाडे तोडण्याबाबत कुठले टेंडर काढलेले आहेत किंवा नाहीत याबाबतही कोणाला कल्पना नाही. त्यामुळे शासनाच्या संपत्तीवर नेमका डोळा तरी कुणाचा व सदर शासन संपत्तीवर कोण कमाई करतो याबाबत संभ्रम निर्माण होत आहे व सदर धरणावर माजी सैनिक मेस्को कं मग सदर झाडे तोडणारी व्यक्ती तेथे पोस्ट टाकत शेकडो झाडांची कत्तल करत आहेत त्यांच्या वर कोणाचे आशीर्वाद आहेत याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जय हिंद
