देऊळगाव माळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.
चिखली | मेघा जाधव
देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी गावामधून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेदरम्यान महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले. तसेच महिलांनी व गावकऱ्यांनी ठीक ठिकाणी पूजन करून अभिवादन केले. या शोभायात्रेमध्ये समस्त समाज बांधव तसेच गावकरी मंडळी, महिला, व तरुण सहभागी झाले होते. यावेळी जय मल्हार सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम मेहकर पोलिस स्टेशनचे बीट जामदार अशोक मस्के, रामेश्वर रिंढे, पोलीस पाटील गजानन चाळगे यांनी पार पाडले.
