बँक ऑफ इंडिया नेरी शाखेचा मनमानी कारभार-- खातेदार त्रस्त, कर्मचारी मस्त

बँक ऑफ इंडिया नेरी शाखेचा मनमानी कारभार-- खातेदार त्रस्त, कर्मचारी मस्त

प्रहार करनार आंदोलन

प्रतिनिधी नेरी-प्रवीन वाघे

मो,7038115037




चिमूर तालुक्यातील नेरी येथे एकच राष्ट्रीयकृत बँक असून या बँकेत हजारोंच्या संख्येने खातेदार आहेत परंतु बँकेसोबत व्यवहार करताना खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे तेव्हा वरीष्ठानी यांची दखल घेऊन कारवाई करावी अशी खातेदारांची मागणी आहे परंतु बँक शाखेत कर्मचारी संख्या कमी आहे हे एकच उत्तर मिळत असल्यामुळे खातेदार त्रस्त आणि कर्मचारी मस्त असे चित्र पहावयास मिळत आहे 

       सविस्तर असे की नेरी येथे बँकेशी व्यवहार करताना खातेदारांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे आता शेतकऱ्यांचा हंगामाला सुरवात होणार आहे त्यामुळे शेतीची पूर्व तयारी करण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे प्रत्येक खातेदार बँकेत येत आहे परंतु  गर्दी जास्त झाल्यावर कर्मचारी हे लीक फेल चा बोर्ड लावत असतात त्यामुळे अनेक खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागते याबद्दल विचारणा केली तर कर्मचारी लिंक फेल आम्ही काय करणार असे उत्तर देतात तसेच खातेदारांची खाते पुस्तिका वर एन्ट्री करून देत नाहीत. त्यामुळे खात्यात किती पैसे आहेत हे कळत नाही तसेच   वृद्ध निराधार लाभार्थ्यांना ताटकळत तासन्तास उभे राहावे लागते त्यामुळे नाहक त्रास सहन करावे लागत आहे नवीन खाते धारकांचे खाते पुस्तिका भेटायला अनेक दिवस चकरा माराव्या लागतात बाहेरील गावातील खातेदार हे व्यवहार करण्यासाठी नेरीला येतात मात्र यान त्या समस्यांमुळे त्यांना रिकामे परतावे लागत असल्याने हताश होत जावे लागते।.या विविध समसेला ग्रासलेल्या मागील काही महिन्यांपूर्वी प्रहार संघटनेने लोटांगण आंदोलन केले होते.व झोनल अधिकारी यांच्याकडुन विविध समस्याचे लेखी पत्र सुद्धा मिळाले होते. परंतु काही दिवस चांगली सेवा देऊन पुन्हा तीच अवस्था बॅंक शाखेत सुरू आहे  हजारो च्या संख्येने खातेदार असल्यामुळे येथे दोन रोख काउंटर असायला पाहिजे अशी अनेकदा मागणी केली गेली परंतु कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे एकच गर्दी झाल्यावर कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडते आणि तारांबळ माजते तेव्हा हे करू की ते करू अश्या अवस्थेत कुणाकुणाचे कामे सुद्धा होत नाही गोर गरीब शेतकरी शेतमजुर जनसामान्य नागरीका॓ना रिकामे परतावे लागते  तेव्हा संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी या बाबीची दखल घेऊन ताबळतोब कारवाई करावी.ही कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने नेरी बॅक आफ इंडिया शाखेला जागेवर आनु असा इशारा  प्रहार सेवका॓नी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler