दिव्यांगाना हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी--शंकर शिरगुळे

दिव्यांगाना हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी--शंकर शिरगुळे

उपसंपादक

संदीप म्हस्के


दिव्यांगाना संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेसह इतर विशेष अनुदान घेणाऱ्या निराधार विधवा परित्यक्ता आदी लाभार्थ्यांना या वर्षांपासून हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्नचा दाखल जोडणे अनिवार्य केल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना याचा फटका बसला असुन ही हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करण्यात यावी यासाठी आज दि ०२/०६/२०२२ गुरुवार रोजी दिव्यांग सेवक शंकर शिरगुळे यांनी जालना तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे या निवेदनात पुढे दिव्यांग सेवक शंकर शिरगुळे म्हणाले की दिव्यांग बांधवाला उत्पन्न काढण्यासाठी खुप हेळसांड होते जो दिव्यांग शारिरीक आवयाने दिव्यांग आसलेल्या व्यक्तीस खुप हेलपाटे मारूनही उत्पन्न दखल लवकर मिळत नाही यामुळे दिव्यांग व्यक्तीला उत्पन्न दाखल काढण्यासाठी अनंत अडचणी समोर येत असल्याने हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट कायम स्वरुपी रद्द करण्यात यावे असे निवेदनात शेवटी दिव्यांग सेवक शंकर शिरगुळे म्हणले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler