अन प्रहार संघटना धावली शेगाव गावाच्या विकासाच्या धडपडीला
शेगाव (बु) येथील दुशीत पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामपंचायत कडुन कोणतीही सोय सुविधेचे काम होत नसल्याबाबत प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या नेतृत्वात बि, डी, ओ, वरोरा यांना निवेदन
प्रतिनिधी:-प्रविण वाघे, मो, 7038115037
शेगाव बु येथील नागरीक दुशीत पाणी व सोय सुविधा अभावी त्रस्त झाले आहे गेली पाच वर्षात ही सरपंच व सदस्य यांच्या व्ययक्तीक वादामुळे गावाला विकास कामापासून वंचित राहावे लागले होते,त्यामुळे आता गावातील नागरीक नवनवीन सरपंच, सदस्य, यांच्याकडून गावातील विकास होईल अशी अपेक्षा करुन बसले होते,आता गावातील सध्याची परिस्थिती पाहता हे ही पुढची पाच वर्षे विकास कामापासून वंचित राहावे लागले का असा प्रश्न गावकरी नागरीकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे कारण मागील वर्षी सारखा या वर्षी सुद्धा सरपंच व सदस्य यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला आहे! वारंवार हा वादविवाद नेमका निर्माण होतो कुठुन या करीता या करीता आपन ग्रामपंचायत शेगाव (बु) येथे प्रत्यक्षात भेट देऊन सत्य परिस्थिती काय आहे याची कसुन चौकशी करुन गावाला न्याय मिळवून द्या अशी या निवेदनाद्वारे देण्यात आले आम्हाला आंदोलन करन्याची वेळ येऊ देऊ नका आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही प्रहार स्टाईलने ताला ढोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्ष महीला आघाडी प्रहार सेवक यांनी दिला आहे!
निवेदन देतांना उपस्थितीत प्रहार सेवक_ शेरखान पठाण, सौ, गीताताई किशोर फुलकर सौ, रंजनाताई सोनुने सौ, सिंधुताई मडावी कु, माधुरी पोईनकर सौ जोशना फुलकर श सागर कामडी, मुजमिल शेख राकेश भुतकर किशोर फुलकर आदी उपस्थित होते

