राजेगांव मध्ये झाडांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन .
आज दिनांक 22 ऑगस्ट रक्षाबंधनच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील राजेगांव मध्ये अनोख्या पद्धतीने "वृक्षबंधन" करून वृक्षारोपण विषयी समाजात जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारतीय सन रक्षाबंधनाच्या जुन्या परंपरेद्वारे निसर्गाशी असलेले आपले बंध मजबूत करण्यासाठी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने या झाडांना भाऊ मानून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आज प्रत्येकांनी घ्यावी व यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन
करण्यात आले .
यावेळी राजेगांव च्या उपसरपंच सीमा शितोळे - देशमुख यांनी झाडाला राखी बांधली .
वृक्ष माझा भाऊ एक राखी झाडाला अशी संकल्पना राबवून आपल्या हिरव्या भावंडांचे अधिक चांगले रक्षण करूया .
झाडांना राखी बांधून "झाडे लावा - झाडे वाचवा" असा संदेश त्यांनी दिला .
झाडे लावल्यानंतर झाडांचे रक्षण व संगोपन खुप महत्वाचे आहे. शहरी व ग्रामिण भागात सुरु असलेली झाडांची अवैध कत्तल रोखुन झाडाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे .
महत्वाचे म्हणजे झाडाचं रक्षण करण्याची भावना नागरीकांमध्ये निर्माण व्हावी या करीता हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
असे प्रहार जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष रमेश शितोळे - देशमुख यांनी सांगितले . "तुम्ही झाडांना वाचवा ते तुम्हाला वाचवतील" असा संदेश श्रृती शितोळे - देशमुख आणि गौरी मोरे या विद्यार्थिनीनी दिला आहे .
मोठी झाडे किंवा अगदी लहान वनस्पती ही मानवी जीवनाचे रक्षक आहेत. बहिणी ज्याप्रमाणे स्वत:च्या संरक्षणासाठी आपल्या भावांना औक्षण करुन राखी बांधतात. त्याचप्रमाणे मानव जातीच्या रक्षणासाठी सर्वप्रथम झाडावेलींचे आभार मानून पर्यावरणाला राखी बांधली पाहिजे. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही
रमेश शितोळे देशमुख यांनी केले आहे.
