महाराणा पुतळा समिती बुलडाण्याच्या अध्यक्षपदी आमदार संजय गायकवाड यांची सर्वानुमते एक मुखाने निवड.

महाराणा पुतळा समिती बुलडाण्याच्या अध्यक्षपदी आमदार संजय गायकवाड यांची सर्वानुमते एक मुखाने निवड.

बुलडाणा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे तसेच कर्तव्यदक्ष आणि महाराणा प्रतापसिंहजी यांचा पुतळा बुलडाणा येथे व्हावा या हेतूने प्रेरित झालेले आमदार संजयभाऊ गायकवाड साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


ओंकार लान्स धाड नाका बुलडाणा येथे शनिवार दिनांक 21- 08 - 2021ला नियोजित महाराणा प्रतापसिंहजी पुतळा समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बुलडाण्याचे कर्तव्य दक्ष आमदार श्री.संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली.


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे जेष्ठ नेते भगवानसिंह राजपूत तर प्रमुख पाहुणे म्हणून चांडोळ ता. जि. बुलडाणा येथील मुळ रहिवाशी तसेच खामगाव चे सिल्व्हर सिटी हॉस्पिटलचे डायरेकटर डॉ.भगतसिंह राजपूत , डॉ. उदयसिंह राजपूत वरणा ,श्री. गजेंद्रसिंह राजपूत मलकापूर आणि काळेगाव चे सरपंच श्री विलास इंगळे हे प्रामुख्याने उपस्थितीत होते. अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून सूचना दिल्या. कार्यक्रमा नंतर आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये सर्व समाज बांधवांनी जाऊन त्यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गजेंद्रसिंह राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन गोपालसिंह राजपूत हरणखेडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन इंजिनिअर एम. डी. जाधव यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler