कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी मुख्य बाजार आवारात 1000 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामाचे भूमिपूजन.
ब्रम्हपूरी ता.प्र./११जुन
मनोज अगडे
9765874115
ब्रम्हपूरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात १००० मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे कडून मंजूर करण्यात आले असून या गोदाम बांधकामाचे भूमिपूजन ब्रम्हपूरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री प्रभाकरराव सेलोकर यांच्या हस्ते दि.११जुन २०२१ रोजी करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक श्री. थानेश्वर पाटील कायरकर, बाजार समिती प्रशासक श्री.वामन मिसार, बाजार समिती प्रशासक श्री. दिवाकर मातेरे, बाजार समिती प्रशासक श्री. सुरेश दर्वे, बाजार समिती प्रशासक श्री. मोरेश्वर पत्रे, बाजार समिती प्रशासक सौ. सुनीताताई तिडके, कृषी पणन मंडळाचे नागपूर विभागीय अधिकारी व कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बगमारे, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांच्या उपस्थित होते.
