राजेगाव येथे मुसळदार पावसाची दमदार हजेरी
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे
तालुक्यातील मौजे राजेगाव येथे 16जुनला सायंकाळी7:30 च्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकय्रांच्या शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतजमिनीचा वरचा भाग पाण्यामुळे सर्व खरडुन गेल्यामुळे शेतजमिन ऊघडी पडल्यामुळे हा भाग अगदी खडकाळ बनला आहे.शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.ऐन पेरणीच्या तोंडावर वरूण राजाच्या आगमनाने जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.प्रशासनाने तात्काळ नुकसान झालेल्या राजेगाव येथील शेतकय्रांच्या शेतजमिनीचे सिंदखेडराजा तालुक्यातील तहसिलदार व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावे व पेरणी करण्यासाठी शेतजमिनीची लेव्हल करून गाळ टाकण्यासाठी आर्थिक भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी राजेगाव ग्रामस्थ शेतकय्रांकडून होत आहे.
