पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ मागे घ्या
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तहसीलदारांना निवेदन
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा: समाधान बंगाळे
देऊळगाव राजा ः पेट्रोल डिझेल सह घरगुती गॅस दरवाढ ही सामान्य जनतेवर अन्यायकारक असून सदर दरवाढ तात्काळ मागे घ्या अन्यथा शासनाविरुद्ध आंदोलन छेडू असा इशारा आज (ता.१८) एका निवेदनाद्वारे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे
विदर्भ राज्य आंदोलन समिती मार्फत आंदोलनाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियम रसायन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ई-मेल द्वारे तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गत सव्वा वर्षापासून कोरोना महामारी मुळे लोक डाऊन करण्यात आले होते परिणामी जनतेचा रोजगार गेला व्यापार उद्योग धंदे मंद झाले बेरोजगारी वाढली मृत्यूचे प्रमाणही वाढले अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस च्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या याचबरोबर इतर सर्व वस्तूवर महागाई वाढतच चालली आहे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल डिझेल सह घरगुती गॅस ची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा विदर्भ राज्य समिती आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे तहसीलदार यांना निवेदन देताना समितीचे समन्वयक तेजराव मुंडे अहमद खान पठाण ज्ञानेश्वर शिंगणे रामदास सोनसळे रावसाहेब पाटील आदींची उपस्थिती होती तर निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
