तपासणी करून उपचार घेतल्यास सिकेलसेलवर नियंत्रण शक्य : डॉ.गो.वा.भगत
चिमूर = उप जिल्हा रुग्णांलयात सिकेलसेल तपासणी व मार्गदर्शन
*प्रतिनिधी:-प्रविण वाघे मो, 7038115037*
चिमूर:- प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या कुटूबांत सिकेलसेल अनुवंशीक असल्यास,जवळच्या नाते संबधात लग्नं केल्यास,पहिल्या बाळाचे सिकेलसेल असल्याचे निदान झाल्यास,३५ वर्षावर गर्भाधारणा झाल्यास,दोन पेक्षा जास्त गर्भपात झाल्यास किंवा कोणतेही कारण न कळता बाळाचे पहिल्या महिन्यात मृत्यु झाल्यास अशा महिला व त्यांच्या कुटुंबियांनी तपासणी करून उपचार घेतल्यास सिकेल नियंत्रण शक्य आहे.असे मार्गदर्शन उप जिल्हा रुग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गो.वा.भगत यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सिकेलसेल आजार नियंत्रण सप्ताहा निमीत्त चिमूर उप जिल्हा रुग्णालय तथा तालुका आरोग्य विभागा मार्फत तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम उप जिल्हा रुग्णांलयात घेण्यात आले.१९ जुन ते २७ जुन पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटनपर मार्गदर्शनात वैद्यकिय अधिक्षक डॉ.गो.वा.भगत बोलत होते.पुढे मार्गदर्शनात उपस्थीतांना सिकेलसेलच्या लक्षणांचीही माहीती विषद केली.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगांबर मेश्राम तथा डॉ.सीम्मी विजय यांनीही मार्गदर्शन केले. सिकेलसेल सप्ताहा निमीत्त ७ व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्याची सिकेलसेल तपासणी करण्यात आली.
उप जिल्हा रुग्णांलया मार्फत जानेवारी पासुन मे २०२१ पर्यंत ५१४ गरोदरमातांची तपासणी केली असता २८ सिकेलसेल पॉझिटिव्ह तर इतर ३०५ व्यक्तींच्या तपासण्यापैकी ११ सिकेलसेल पॉझिटिव्ह आढळले. ईलेक्ट्रोफोर्स तपासणीत १६ सिकेलसेल पॉझिटिव्ह आढळल्याचे उपस्थीतींत मान्यवरांनी सांगीतले.या कार्यक्रमास डॉ.नितिन चौधरी,डॉ.अश्विनी पिसे,रक्तपेढी तंत्रज्ञ लहाने,विश्वास महाबळे,अधिपरीचारीका मैदंळ, पवार,ढाले,पाटील ,ठोकळे सह सर्व आरोग्य कर्मचारी तथा रुग्णं उपस्थित होते.
