कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन
गरजू कुटूंबांना केली आर्थिक मदत
ब्रम्हपूरी २० जुन
ता.प्र/मनोज अगडे
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, नगराध्यक्षा रिता उराडे, प्रमोद चिमुरकर,न.प. गटनेते विलास विखार, प.स.सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर,शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, नानाजी तुपट, तहसीलदार विजय पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, दुर्दैवाने कोरोना आजाराने अनेकांचे मृत्यु झाले. यातच घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटूंब उघड्यावर पडले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मिळणारी मदत ही अपुरीच आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील जवळपास 175 मृत्यु कोरोनामुळे झाले आहे. सुरवातीच्या काळात तालुक्यात दहासुध्दा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध नव्हते. मात्र शासन आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आजमितीला तालुक्यात 110 ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध आहेत. या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था अपु-या पडल्या तरी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न झालेत. त्यामुळे नागरिकांनासुध्दा दिलासा मिळाला. कोरोनाचा धोका अजूनही संपला नसून नागरिकांनी येणाऱ्या तिस-या लाटे संदर्भात काळजी घ्यावी. तसेच उत्तम आरोग्य बाळगण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.
00000
