प्रधानमंत्री आवास योजनेत गैरप्रकार
----------------------------------------------
शिवसंग्रामची पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तक्रार
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा।समाधान बंगाळे
देऊळगांव राजा तालुक्यातील
पक्के घरे नसलेल्या शहरातील गरजू कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी नुकतेच प्रकाशित लाभधारकाच्या यादीत नगर पालिका प्रशासनाच्या कृपेने धनदांडग्यांनी आपले प्रस्थ जमविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीय आला आहे.योजनेच्या निकषांला डावलून मर्जीतील लोकांना सदर यादीत समावेश केल्याने खरे लाभार्थी योजनेपासून वंचित झाले आहे.याबाबत आज स्थानिक विश्रामगृह येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले व संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
येथील नगर पालिकेच्या माध्यमाने शहरातील ज्या कुटुंबाकडे पक्के घरे बांधलेली नाहीत अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.डीपीआर प्लाननुसार सदर योजनेच्या लाभार्थ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.मात्र सदर यादीत नगरसेवकाच्या घरातील नातेवाईक,शासकीय कर्मचारी,नगर पालिका कर्मचारी,एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.एवढेच नव्हे तर ज्यांच्याकडे शहरात पक्की दुमजली इमारत आहे आशा व्यक्तीचे नावे या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.परिणामी शहरातील असंख्य दुर्बल घटकातील कुटुंब या योजनपासून वंचित राहिले आहे.याबाबत शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जहीर पठाण,अजमत खान यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली असून सर्व्हे करणारी एजन्सी व नगर पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान सदर यादीत धनदांडग्याचा समावेश करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करून पाहणाऱ्या महाभागांवर कारवाईला करण्याचे संकेत डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.
