चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक१९.६.२०२१ ला केंद्र सरकारचा निषेध करत... चिमूर काँग्रेस कमिटीतर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनीधी:- प्रविण वाघे नेरी मो, 7038115037
राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातर्फे देशात वाढलेली जीवनावश्यक वस्तूंची महागाई, पेट्रोल डिझेल चे वाढते दर, कृषी कायदा, गॅस च्या वाढत्या किमती व विविध विषयावर जोरदार प्रहार करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
आज चिमूर काँग्रेस कमिटी तर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्याच बरोबर, पेट्रोल पंप, गॅस दुकान, तहसील अश्या विविध ठिकाणी जाऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला
तसेच चिमूर काँग्रेस कमिटी तर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्याच बरोबर विविध ठिकाणी जाऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला याचे नेतृत्व सतीश वाराजूरकर जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस गटनेता यांनी केले.
त्याचप्रमाणे युवक काँग्रेस कमेटीचा अभिनव उपक्रम
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व वृद्ध व्यक्तींना युवक काँग्रेस कमिटी तर्फे चिमूर व ग्रामीण भागात अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजय डाबरे, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव अवि अगडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत डवले, शंकरपुर चे सरपंच साईश वारजूरकर, राहुल गांधी विचार मंच विदर्भ अध्यक्ष प्रवीण जीवतोडे, पप्पू शेख, गौतम पाटील, तुषार शिंदे,अमित मेश्राम, शुभम पारखी,राजू चौधरी, मनीष नंदेश्वर,विनोद राऊत ,विलास मोहिणकर,गीताताई रानडे,नाजेमा पठाण,दिक्षताई भगत,कल्पनाताई इंदूरकर, व इतर महिला,युवक, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते
