इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसची ब्रम्हपुरी येथे निदर्शने
खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
ब्रम्हपूरी ता.प्र.:-१९ जुन
मनोज अगडे 9765874115
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस ब्रम्हपुरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. सोबतच यानिमित्ताने ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी महाराज चौक व इंडेन गँस एजन्सी समोर इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकार विरुद्ध निदर्शने करण्यात आले.
मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणसाचे जिवन जगणे कठीण झाले आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत कष्टकरी, मजुर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, ब्रम्हपुरी नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे, नगरसेविका सौ.सुनिताताई तिडके, नगरसेविका श्रीमती निलीमाताई सावरकर, ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमेटिच्या अध्यक्षा सौ.मंगलताई लोनबले, शहर महिला काँग्रेस कमेटिच्या अध्यक्षा सौ. योगिताताई आमले, अनु.जाती सेल तालुका अध्यक्ष प्रमोद मोटघरे, तालुका युवक काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष रुपेश बानबले, युवक काँग्रेस शहर कमेटिचे अध्यक्ष रवी पारधी, जगदीश आमले,संजय ठाकूर, मुन्ना रामटेके, सोमेश्वर उपासे, दत्तात्रय टिकले, चंद्रशेखर मेश्राम, दिवाकर मातेरे, रामराम चव्हाण, अमोल सलामे, सुरेश वंजारी यांसह अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
